दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला हात दाखवून थांबवले आणि त्यानंतर हात मिळवण्याचा बहाना करत त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेत पोबारा केला.24 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऑलवेल बंगल्यासमोर ही घटना घडली आहे.