माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील पाचोंदा येथील शेत शिवारात अंतकलाबाई अशोक अडागळे वय 55 व अनुसयाबाई साहेबराव अडागळे वय 50 यांचा कापूस वेचणी करीत असताना कुणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचा गळा दाबून दिवे मारून त्यांचे दागिने लुटून नेले होते, याप्रकरणी माहूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता, तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या 12 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी दत्ता लिंगलवार व गजानन येरजकर ह्या दोघा आरोपींना जेरबंद केले आहेत.