खासदार संजय देशमुख यांचे कट्टर समर्थक तसेच दिग्रस शहर व तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमराव खरोडे, माजी नायब तहसीलदार कनाके, संतोष सातपुते, जगदीश सातपुते, परशराम डाहणे, लक्ष्मण डुकरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत शक्ती दाखवली.