राहाता: 'वंदे मातरम ' राष्ट्रीगीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन..
आज प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी 'वंदे मातरम्' या गीताच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि मातृभूमीप्रेमाचा संदेश प्रभावीपणे व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित.