हिंगणघाट: माता मंदिर रोडवर एम.डी.अंमली पदार्थ तस्करी करणारे पाच आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या जाळ्यात
हिंगणघाट वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांच्या विक्री व तस्करीवर अंकुश आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हिंगणघाट शहरातील माता मंदिर रोडवर एम.डी. अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या पाच जणा विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. असून सुमारे १० लाख ४२ हजार १२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.