चिखली: किनोळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आ. श्वेता ताई महाले यांच्या हस्ते शुभारंभ
भारतातील गावखेड्यांचा विकास गतिमान करणारे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'चा आ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते भव्य शुभारंभ मौजे किन्होळा येथून केला.या अभियानाअंतर्गत गावांच्या प्रगतीसाठी चांगले काम करणार्या ग्रामपंचायतींना शासन रोख पुरस्कार देणार आहे. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचाही सन्मान होणार असल्याने सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन या वेळी केले.