गोंदिया: गोंदिया नगर परिषद निवडणुकीत चार दांपत्य रिंगणात
Gondiya, Gondia | Nov 28, 2025 नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व 44 नगरसेवक पदाकरिता 4 पती-पत्नी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक रिंगणात उभे आहेत.गोंदिया नगराध्यक्ष पदाकरिता काँग्रेस पक्षाकडून सचिन गोविंद शेंडे हे उमेदवार,तर त्यांची पत्नी विशाखा सचिन शेंडे यांना काँग्रेस पक्षाने प्र.क्र. 2 मधून नगरसेवक पदाकरिता उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडून पती-पत्नी असलेले राकेश ठाकूर यांना प्र.क्र.18 मधून उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांची पत्नी शिलू राकेश ठाकरे यांना प्रभाग क्रमांक 19 मधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.