नागपूर ग्रामीण: शहरातील राही ट्रेडर्स नावाच्या दुकानाला आग, लाख रुपयांचे साहित्य जळून खाक
कालमेघ नगर येथील राही ट्रेडर्स या हार्डवेअरच्या दुकानाला 20 ऑक्टोबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आग मध्ये पेंटचे डबे प्लास्टिकच्या वस्तू आधी लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. राऊत यांच्या मालकीचे राहि ट्रेडर्स हे हार्डवेअर चे मोठे दुकान आहे. ते आज सायंकाळी सात वाजता दुकानात काम करणाऱ्या कामगारांसह दुकान बंद करून घरी निघून गेले होते. दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारास दुकानातून धूर निघताना दिसून आला