बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान, सासुरा येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता वाढला आहे. मठाधिपती आणि त्यांच्याच माजी उत्तराधिकारी यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, दोघांनीही थेट पोलीस ठाण्यात धाव घेत परस्परांवर गंभीर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात दोन्ही महाराजांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, 'मठाची गादी' आणि 'उत्तराधिकार' यावरून हा वाद टोकाला पोहोचल्याची चर्चा