देऊळगाव राजा तालुक्यातील वाघुळ परिसरात भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सोमवार दि. 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजात मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून त्याच्यावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अपघातात स्वाती विजय खेतरे रा. बालाजी कॉलनी, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा या तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरु आहे.