मुळशी: मारुंजी येथे जागेची बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक
Mulshi, Pune | Sep 30, 2025 जागेची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर दुसऱ्या लोकांना जागेची विक्री करून महिलेची दोन कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.