भंडारा: भंडारा जिल्हा पणन कार्यालयाचा लिलाव थांबणार ! आंदोलनाचा इशारा देतात शासनाने रक्कम केली जमा
उन्हाळी धान पिकाचे शासकीय आधारतभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करूनही पैसे न मिळाल्याने भंडारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी भंडारा येथील जिल्हा पणन कार्यालयाचा लिलाव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या घटनेची दखल घेत 24 सप्टेंबर रोजी शासनाकडून 114 कोटी रुपये जिल्हा पणन कार्यालय भंडारा येथे जमा झाले आहेत. माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शासनाने ही रक्कम भंडारा येथील जिल्हा पणन कार्यालयास प्राप्त झाले.