आरमोरी: पळसगाव येथे विविध समस्यांवर आमदार मसराम यांची आढावा बैठक
पळसगाव ता.आरमोरी येथे विविध समस्यांवर आमदार रामदास मसराम यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपापल्या विविध समश्या आमदार रामदास मसराम यांच्या समोर मांडल्या. सदर समश्या तात्काळ निकाली काढण्याचे आस्वाशन रामदास मसराम यांनी ग्रामस्थांना दिले.