रामटेक उपविभागातील वन्यजीव वनपरिक्षेत्र देवलापारचे वनपरिक्षेत्राधिकारी अभिजीत इलमकर यांच्या 'रिदम ऑफ द वाईल्ड व्हाइसेस ऑफ द अन हर्ड' या कवितासंग्रहाचे प्रकाशन हरिसिंग सभागृह,, नागपूर येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सोमवार दिनांक 24 नोव्हेंबरला दुपारी एक वाजता च्या दरम्यान पार पडले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक व वन्य बल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव आणि मुख्य वन्यजीव संरक्षक एम एस रेड्डी उपस्थित होते.