मेहकर: फरदापुर टोलनाके नजिक समृद्धी महामार्गावर सोने लुटणाऱ्या आरोपींना पोलीस कोठडी मागितली पोलिसांनी मागून
समृद्धी महामार्गावरील सोन्याची लूट प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. साडेचार कोटी रुपयांच्या सोन्याच्या लुटीतील सहा आरोपींना पोलिसांनी पुन्हा मेहकर न्यायालयात हजर केलं असून, मेहकर पोलिसांनी आरोपींची अतिरिक्त कोठडीची मागणी केली आहे.पोलिसांचा दावा आहे की अजूनही अडीच कोटी रुपयांचे सोने सापडलेले नाही आणि मुख्य सूत्रधार फरार आहे.२२ ऑगस्टच्या सायंकाळी फर्दापूर टोल नाक्याजवळ मुंबईतील एका सोनेव्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साडेचार कोटी रुपयांचे सोने लुटण्यात आले होते.