धुळे जवळील नगाव परिसरात गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न गोरक्षक आणि पोलिसांनी हाणून पाडला. मध्य प्रदेशातून मालेगावकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये गोवंश नेले जात असल्याची माहिती मिळताच पथकाने ६३ किमी पाठलाग करून नगावजवळ कंटेनर रोखला. कारवाईत ५७ गोवंशांना जीवदान मिळाले. कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला असून गोवंश सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.