नागपूर ग्रामीण: टाकळघाट येथे गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल
एमआयडीसी बुटीबोरी पोलिसांनी टाकळघाट येथे महिला आरोपी व तिच्या साथीदार नागेश पिल्लेवान हा गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मार कार्यवाही करून 861 ग्राम गांजा, गांजा विक्रीतून मिळालेले पैसे आणि दुचाकी असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी बुटीबोरी पोलीस करीत आहे.