कर्जत: कर्जत तालुक्यात दोन पाच वर्षीय चिमुकल्या मुलींवर केला स्कूल बस मधल्या मदतनिसाने अत्याचार - कर्जत पोलिस ठाण्यात पोक्सो अं
Karjat, Raigad | Apr 17, 2025 कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपी करण दीपक पाटील यास कर्जत पोलीस यांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.