शैलेश भगवान राव बूबना यांनी राजेंद्र श्रीकृष्ण करनाके राहणार अंजनसिंग यांच्या विरोधात कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे. राजेंद्र श्रीकृष्ण करनाके यांनी बार मधील वेगवेगळ्या कंपनीच्या मद्य विक्री करून 7,94,080 हजार रुपये व स्टॉक रजिस्टर घेऊन तो पळाला अशी तक्रार पोलिसात शैलेश यांनी दिली आहे .तेव्हा कुऱ्हा पोलिसांनी राजेंद्र करनाके यांच्या विरोधात विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.