वाशिम: वाशिम जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर, राजकीय हालचालींना वेग
Washim, Washim | Sep 15, 2025 आगामी पंचायतराज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा प्रशासनाने पंचायत समित्यांमधील सभापती पदांची आरक्षण यादी दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी केली आहे. या जाहीर केलेल्या यादीनुसार वाशिम पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मंगरुळपीर पं.स. अनुसूचित जाती, मानोरा पं.स. सर्वसाधारण (महिला), मालेगाव पं.स. सर्वसाधारण (महिला), रिसोड पं.स. सर्वसाधारण गटासाठी तर कारंजा पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.