संजय राऊत तुम्ही थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या: भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं अशा शब्दात आज दुपारी १.३० वाजता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाला सुनावले. संजय राऊत, तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखाद-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या, लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात अस ते म्हणाले.