नांदेड : माळेगाव यात्रा मध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागांच्या वतीने आरोग्य कार्यक्रम चा जागर व आरोग्य प्रदर्शनी बरोबर आरोग्य शिबिरात विविध यात्रा मध्ये येणारे भाविक याच्या वयोगटानुसार त्याची आरोग्य तपासणी करून निदान करून औषध उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये 100 जणांची सद्यस्थिती सिकलसेल आजार साठी तपासणी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम मा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मेघनाखावली आणि उपसंचालकमा. रेखा गायकवाड आरोग्य सेवा लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.