दस्केबर्डी येथे तानाजी दशरथ अहिरे वय ४५ यांना लग्न मोडल्याच्या संशयावरून शांताराम नागो बोरसे, दिनेश शांताराम बोरसे व सोपान ज्ञानेश्वर बोरसे या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली व त्यांच्या उजव्या हातावर टनकदार वस्तुने मारून तसेच डाव्या डोळ्याजवळ मारून दुखापत केली. तेव्हा तीन जणाविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.