शिक्रापूर-चाकण रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातात ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागून प्रवास करत होती. महिलेचा हा प्रवास अखरेचा ठरला.हा अपघात शिक्रापूर चाकण रोड, साबळेवाडी येथे घडला. सिंधुबाई पांडुरंग शेळके (६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या जावयाने चाकण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली.