खुलताबाद: खुलताबाद नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर १ हजार १९० आक्षेप दाखल
खुलताबाद नगरपरिषदेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती या यादीत अनेक घोळ असून अनेकांची नावे चुकीच्या प्रभागात गेली आहेत.काही कुटुंबांची नावे दोन वेगवेगळ्या प्रभागांत विभागली गेली आहेत.सध्या या यादीवर १ हजार१९० जणांनी आक्षेप नोंदविला आहे.भाजपचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांनी कार्यालयात बसून यादी तयार झाल्याचा आरोप केला.शहरात १० प्रभाग असून प्रत्येक प्रभागात बाहेरच्या प्रभागातील मतदारांचा समावेश झाला आहे.