सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवडा दिनांक 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविणार
157 views | Sindhudurg, Maharashtra | Nov 21, 2025 कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत 'पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५' सिंधुदुर्ग जिल्हयात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे घोषवाक्य "स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार." असे आहे. पुरुष नसबंदी ही कुटुंब नियोजनाची अत्यंत प्रभावी पध्दत असून स्त्री नसबंदीच्या तुलनेत फारच सोपी ,सुरक्षित व कमी गुंतागुतीची पध्दत आहे.या शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णालयातून घरी जाता येते.