शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजेपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.शहरात कडाक्याची थंडी असूनही मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या असून दुपारी दीड वाजेपर्यंत 38 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः 'ॲक्शन मोड'मध्ये असून ते त्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली