लाखनी: परतीच्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार! ओल्या धानपिकावर बुरशी : शेतकऱ्यांची अन्न वाचविण्याची झुंज सुरू
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. परिपक्व अवस्थेतील धानपिक जमीनदोस्त झाले असून, अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. हाती आलेल्या उत्पन्नाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग चिंता आणि तणावात आहे. पावसामुळे भिजलेले धान आता वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना उन्हात झटावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या धानावर बुरशी चढली असून काही ठिकाणी पिके अंकुरल्याचेही दिसून येत आहे.