आळंदी-मरकळ रोडवर एका अज्ञात दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे एक इसम जखमी झाला. अपघातानंतर धडक दिलेला दुचाकीस्वार घटनास्थळाहून पळून गेला. ही घटना सोमवारी दुपारी पावणे चार वाजता घडली.या प्रकरणी अनिल मोतीराम पवार (वय ३२, रा. गोपाळपुरा, द्वारका हौसिंग सोसायटी, आळंदी ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.