चाळीसगाव: रस्त्यावर पडलेल्या विज वाहक तारांचा शॉक लागून दोन म्हशी व दोन पारड्यांचा जागीच मृत्यू
बेलदारवाडी शिवारात काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रस्त्यावर तुटून पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेच्या धक्क्याने दोन म्हशी आणि दोन पारड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत पशुपालक राजू बाबुराव कुमावत यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलदारवाडी येथील शेतकरी राजू बाबुराव कुमावत यांच्या मालकीच्या दोन म्हशी आणि दोन पारड्या सिध्देश्वर आश्रमाजवळील शिवारात चरत होत्या.