सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष देशमुख यांच्या एका प्रचार सभेदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रसंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सावनेर हद्दीतील १३ वर्षीय मुलगा मागील काही दिवसांपासून बेपत्ता आहे. या मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली असूनही पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तिने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार, २४ नोव्हेंबर) आमदार आशिष देशमुख यांच्या प्रचार सभेसाठी जमलेल्या गर्दीजवळ बेपत्ता मुलाची आई पोहोचली.