महागाव येथे तालुकास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई देंगे, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई देशमुख, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, पंचायत समिती उपसभापती संदीपजी कापगते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.