गोंदिया: विक्रीसाठी साठवून ठेवलेली दारू केली जप्त,ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत पांढराबोडी येथे घटना
ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत पांढराबोडी येथे विक्रीसाठी साठवून ठेवलेली मोहफुलाची १० लिटर दारू पोलिसांनी धाड टाकून जप्त केली. बुधवारी (दि.५) सायंकाळी ५:४५ वाजता ही कारवाई करण्यात आली असून आरोपी धनिराम उदेलाल उपवंशी (५३, रा. पांढराबोडी) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.