मा.प्रधान सचिव , सार्वजनिक आरोग्य विभाग श्री.वीरेंद्र सिंह यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट
201 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 10, 2025 मा. प्रधान सचिव 2 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र यांनी आज दिनांक 9 ऑक्टोंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. मुख्यमंत्री 150 दिवस कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव मा.श्री वीरेंद्र सिंह साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा सभा संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मा.जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबुडकर, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील उपस्थित होते.यावेळी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, आयुष्यमान आरोग्य मंदिर बांदा ,उपकेंद्र बांदा नंबर 1 या आरोग्यसंस्थांना भेटी दिल्या