यवतमाळ: काँग्रेसच्या उमेदवारीसाठी २४० जणांच्या मुलाखती ; नगराध्यक्षासाठी सहा दावेदार
यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेवक व नगराध्यक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती काँग्रेसने घेतल्या. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात इच्छुकांची मोठी गर्दी जमली होती. नगरसेवकांसाठी ५८ जागेकरिता तब्बल २४० जणांनी मुलाखती दिल्या. तर नगराध्यक्षपदासाठी सहा इच्छुक पुढे आले