वडगाव मावळ येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत आनंद बाजार उत्साहात संपन्न झाला. पालकांनी बाजारात विविध वस्तूंची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढवून त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्याच्या उद्देशाने येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राथमिक शाळेत आनंद बाजार भरविण्यात आला होता.