आज दिनांक 25 ऑक्टोबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजता भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय भोकरदन येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपावली स्नेहलन कार्यक्रम संपन्न झाला आहे, या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ह भ प ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून यानंतर उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांची दानवे यांनी विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे ,यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.