नगर- मनमाड महामार्गावर शिंगणापूर फाटा येथे मालवाहतूक करणारी ट्रक पलटी झाल्याने सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. आज रविवारी रात्रीच्या दरम्यान रस्त्यातील खड्ड्यामुळे ही मालवाहतूक पलटी झाली. नगर-मनमाड महामार्ग हा मोठ्या प्रमाणात नादुरुस्त असून एकेरी वाहतूक सुरू आहे,त्यात रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेक छोटी-मोठी अपघात हे सातत्याने होत असतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे खड्ड्यात ट्रक केल्याने पलटी झाला.त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.