उदगीर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्या भोवती मोठ्या प्रमाणात धूळ साचली असून नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाल्या होत्या,नगरपालिका प्रशासनाने बातम्यांची दखल घेत उदगीर शहरातील देगलूर रोडवर असलेल्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली,उदगीर शहरातील सर्वच महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतली आहे