सेनगाव: नागा सिनगी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
सेनगाव तालुक्यातील नागा सिनगी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता संविधान दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते मारोती गीते, रोजगार सहाय्यक बालाजीराव गीते, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गीते,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संविधान दिनानिमित्त संविधान वाचन करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.