अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या धरणगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.