मौजा धामणेवाडा (ता. गोंदिया) येथे गोंदिया जिल्हा परिषदेमार्फत आयोजित केंद्रस्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती गोंदिया चे सभापती मुनेश रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण असून, विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक कौशल्यांना दिशा देने हा या महत्त्वाचा प्रमुख उद्देश असल्याचे सभापती रहांगडाले यांनी सांगितले.