चामोर्शी: विषबाधित काशीपूर गावात ३ रुग्णवाहिकांची व्यवस्था... मृतकाच्या कुटुंबीयांना आमदार मिलिंद नरोटे यांनी दिली भेट
१६ सप्टेंबर रोजी चामोर्शी तालुक्यातील काशीपूर गावात पाणीपुरवठ्यातून झालेल्या विषबाधेमुळे अनेक ग्रामस्थ आजारी पडले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले. दुर्दैवाने यात एका माऊलीचा मृत्यू झाला. या गावात तीन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली असून आमदार मिलिंद नरोटे यांनी मृतकाच्या कुटुंबीयांना भेट दिली.