नागपूर ग्रामीण जिल्ह्यात गोवंश तस्करी चोरी आणि इतर अवैध धंद्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर आता कठोर कायदेशीर टाच आणली जात आहे. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तब्बल 238 वाहनांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.