सार्वजनिक रस्त्यावर मध्ये प्राशन करून धोकादायक पद्धतीने मोटरसायकल क्रमांक एम.पी.50 एस.ए.7826 चालवीत असलेला अंकित श्यामकुवर वय 25 वर्षे राहणार टेमनी या तरुणाला दवनीवाडा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रंगेहात पकडले. सदर कारवाई दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शुक्रवारला करण्यात आली. त्याचावर मोटर वाहन कायदा कलम 185 अन्वये दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.