शिरपूर: करवंद रस्त्यावर दुचाकी गाईला धडकल्याने भीषण अपघात,युवकाचा जागीच मृत्यू ,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Shirpur, Dhule | Oct 18, 2025 शिरपूर तालुक्यातील करवंद रस्त्यावर हॉटेल साई स्वादजवळ 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रस्त्यात गाईला दुचाकी धडकल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रामचंद्र नकाला पावरा वय 30, रा. जुनी सांगवी ता.शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे.