पालम: बनवस येथे कुटुंब झोपलेले असताना घरफोडी, दागिने रोख रक्कम लंपास
Palam, Parbhani | Sep 17, 2025 कुटुंब झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरात येऊन एक लाख 38 हजार रुपयाचे दागिने रोख रक्कम लंपास केल्याची घटना पालम तालुक्यातील बनवस येथे दिनांक 16 सप्टेंबरला पहाटे दोन वाजता उघडकीस आली. याप्रकरणी 16 सप्टेंबरला रात्री सातच्या सुमारास पालम पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करत आला आहे.