हिंगणा मतदार संघातील वानाडोंगरी येथे " हळदी कुंकू " समारंभ कार्यक्रम पार पडला. याठिकाणी मतदारसंघातील भाजप चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेविका यांच स्वागत करून सन्मान सौ वृंदाताई समीर मेघे यांनी केला. महिलाकरिता नृत्य व उखाणे स्पर्धा यावेळी घेवून त्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाला आईसाहेब सौ शालिनीताई मेघे, डॉ पुजा उके, सौ सुनंदाताई बागडे, सौ भूमिकाताई मंडपे, सौ रोषणाताई कोलते, सौ लताताई गौतम, सौ संगीताताई नरेश चरडे, कु अंजलीताई कानफाडे, सौ राजूताई भोले आदी उपस्थित होते.