कळमेश्वर: निवडणूक काळात दारू व पैसे वाटत असाल तर सावधान ; कळमेश्वर शहरात ड्रोन पेट्रोलिंग सुरू
29 नोव्हेंबरला रात्री नऊ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने जोमाने सुरू असतानाच अनेक ठिकाणी या काळात दारू व पैसे वाटपाचे प्रकार समोर येतात अशातच अशा प्रकारची कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी कळमेश्वर शहरात पोलीस अधीक्षक ड्रोन पेट्रोलिंग सुरू आहे. याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. दरम्यान अशा प्रकारची कोणतीही घटना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा देखील पोलिसांतर्फे देण्यात आला आहे.