बुलढाणा: छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित रहावे - अभिनेते मकरंद अनासपुरे
बुलढाणा शहरातील एकता नगर परिसरात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभारलेले “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह” या भव्य सांस्कृतिक वास्तूचा लोकार्पण सोहळा येत्या ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता पार पडणार आहे.या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले आहे.